रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन बेडसाठी नाशिकमध्ये रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर

रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन बेडसाठी नाशिकमध्ये रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर

रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन बेडसाठी नाशिकमध्ये रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा, रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवावा तसेच सर्वच पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध करुन द्यावेत या मागण्यांसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांनी शनिवारी (दि.१०) सकाळी नाशिकमधील मेहेर सिग्नलवर ठिय्या आंदोलन केले.बंदोलकांची समजूत घालतांना पोलिसांची पुरती दमछाक होत होती.

दोन महिन्यांपासून नाशिकमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज सरासरी चार हजार नवीन पिझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णांना खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी बेडस शिल्लक नाहीत. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठाही अपुरा पडत आहे. हे इंजेक्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. तरीही इंजेक्शन मिळेलच याची शाश्वती नसते. या इंजेक्शनचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १२०० रुपयांचे हे इंजेक्शन काही मंडळी तब्बल ५ हजार रुपयांपर्यंत विकत आहे. तसेच बनावट इंजेक्शन विक्रीही सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ९) उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाले असून त्यांची सहनशीलता संपल्याने शनिवारी ते रस्त्यावर उतरले. मेहेर परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन करीत आपल्या मागण्या मांडल्या. नातेवाईकांची समजूत घालतांना पोलिसांचे नाकेनऊ आले होते. रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने त्यांचे नातेवाईक आता कायदा हातात घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत असे चित्र सध्या शहरात आहे.


हेही वाचा – दुर्दैवी घटना: नागपूरच्या कोविड ‘वेल ट्रिट’ रुग्णालयाला आग; ४ जणांचा मृत्यू


 

First Published on: April 10, 2021 12:35 PM
Exit mobile version