Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दुर्दैवी घटना: नागपूरच्या कोविड 'वेल ट्रिट' रुग्णालयाला आग; ४ जणांचा मृत्यू

दुर्दैवी घटना: नागपूरच्या कोविड ‘वेल ट्रिट’ रुग्णालयाला आग; ४ जणांचा मृत्यू

वेल ट्रिट रुग्णालयाला अचानक भीषण आग लागली असून या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून आगीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भांडुपच्या ड्रिम्स मॉलमधील कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतना आता पुन्हा एकदा कोविड रुग्णालयाला आग लागल्याची घटना नागपूर-अमरावती रोडवरील वाडी येथे घडली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या वेल ट्रिट रुग्णालयाला अचानक भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसह इतर आजारांचे जवळपास ५० रुग्ण देखील उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाडीतील पूजा चेंबर्स इमारतीमध्ये सुरु असलेल्या वेल ट्रिट रुग्णालयामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये अचानक आग लागली. एसीमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान, तिसऱ्या मजल्यावर १७ रुग्ण तर चौथ्या मजल्यावर ५ रुग्णांवर उपचार सुरु होते. तर संपूर्ण रुग्णालयात ५० च्या जवळपास रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच नर्सने एसीजवळील रुग्णांचे बेड हलविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांने रुग्णांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत आगीच्या धुरामुळे श्वास कोंडल्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. तर त्यातील तुळशीराम पाल या रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय दुसऱ्या रुग्णालयात आणताना तीन रुग्ण दगावले. तर रुग्णालयाच्या आयसीयूतील इतरही काही रुग्ण गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नागपूरमधील रुग्णालयात लागलेली आग ही दु:खद घटना आहे. ज्या व्यक्तींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. तसेच या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

नातेवाईकांना दिलासा मिळावा

काँग्रेसचे सचिव आशीष दुआ यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आगीत जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्याची मागणी केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईसाठी १ लाख ८८ हजार लसीचा साठा


 

- Advertisement -