रुग्ण बरा झाल्यानंतरही असणार 28 दिवस प्रतिबंधित क्षेत्र         

रुग्ण बरा झाल्यानंतरही असणार 28 दिवस प्रतिबंधित क्षेत्र         

राज्यासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढत आहे. ज्या भागात कोरोनाचा रूग्ण आढळला आहे. ते भाग पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असले तरी आता शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आता करोनाबाधित क्षेत्रातील शेवटचा रूग्ण पूर्ण बरा होऊन रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्या पुढील 28 दिवसांपर्यंत हे प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे. शासनाने आपत्ती व्यावस्थापन कायदा व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1817 नुसार प्रतिबंधीत क्षेत्रासाठी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाशिक शहरात विविध भागात पाच करोनाचे रूग्ण आढळले आहेत. शहरातील पहिला रूग्ण गोदिवंदनगरच्या मनोहरनगर येथे आढळला होता. यानंतर नाशिकरोड, धोंगडेमळा, नवश्या गणपती परिसर, आनंदवली, गंगापूररोड, सातपूर – अंबड लिंकरोड अशे पाच भाग प्रतिबंधात्मक क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. रूग्णाच्या घरापासून सर्व बाजुंनी तीन किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्र तर पाच किलोमीटर क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहेत. या भागात पोलिसांनी पुर्ण बॅरेकेटींग करून अंतर्गत वाहतुक बंद केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी पूर्ण खबरदारी घेऊन ठरावीक नागरिकांनाच बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे. पुर्वी हे प्रतिबंधीत क्षेत्र हे रूग्ण सापडल्यानंतर त्यास 14 दिवस कोरोंटाईन केल्याचा कालावधीपुरते मर्यादीत ठेवले होते. 14 दिवसांनतर हे क्षेत्र खुले करण्यात येणार होते. मात्र, कोरोना एक रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या सानिध्यातील अनेकजण करोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. शासनाच्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधात क्षेत्रात असलेल्या एकूण करोना रूग्णांपैकी शेवटचा रूग्ण पूर्ण बरा होऊन रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पुढील 28 दिवस प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार असून त्यानंतर ते खुले करण्यात येणार आहे.

First Published on: April 22, 2020 9:39 PM
Exit mobile version