प्रजासत्ताकदिनी पालिका कर्मचार्‍यांना वेतन आयोग

प्रजासत्ताकदिनी पालिका कर्मचार्‍यांना वेतन आयोग

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तिवर नाशिक महापालिकेतील साडेपाच हजार कर्मचार्‍यांना प्रजासत्ताकदिनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी रविवारी (दि.10) जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा केली. नाशिक महापालिकेत 189 संवर्गातील सुमारे साडेपाच हजार कर्मचारी आहेत. त्यात सहायक आयुक्त व विभागीय अधिकार्‍यांना वेतन आयोग लागू करताना वेतन श्रेणी कोणती ठरवायची याविषयी पेच निर्माण झाला आहे. वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या निर्णयामध्ये विभागीय अधिकारी या पदाचा उल्लेखच नाही. तसेच उपायुक्तांना कोणती वेतन श्रेणी लागू करायची याविषयी स्पष्टता नसल्यामुळे महापालिकेचा वेतन आयोग रखडला आहे. तसेच मंत्रिमंडळात वरिष्ठ लेखा परिक्षक हे पद सहायक लेखा परीक्षकाच्या वरच्या स्थानावर आहे. तर महापालिकेत याऊलट परिस्थिती असल्यामुळे वेतन आयोग लागू करताना अडचण निर्माण झाली आहे. या सर्व कर्मचार्‍यांची संख्या जवळपास 20 ते 25 असल्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांचा वेतन आयोग रखडलेला आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांचा राज्य पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्यांना वेतन आयोग देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उर्वरीत कर्मचार्‍यांना येत्या 26 जानेवारीपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश भुजबळांनी दिले. यानिमित्त कर्मचार्‍यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला आहे.

First Published on: January 10, 2021 9:39 PM
Exit mobile version