लायकी नसणारे अपक्ष लोकसभेच्या रिंगणात

लायकी नसणारे अपक्ष लोकसभेच्या रिंगणात

शिवसेना नेते खासदार संजय राऊत

युतीच्या विरोधात बंड करुन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलले सिन्नरचे माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा बाण शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांची जिल्हा परिषदेला निवडून येण्याची लायकी नाही आणि लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी बुधवारी (ता. २४) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, की अयोध्येमध्ये राम मंदिर हवे असेल तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवे. मोदी पंतप्रधान झाल्यास अयोध्याच काय, लाहोर व कराचीमध्ये देखील आम्ही मंदिर उभारू शकतो. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक झाला. यापुढे पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. मोदींचे हात बळकट करण्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे. नाहितर गुंड, पुंड आणि झुंडांना निवडून पाठिविणार का? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसेच भाजपमधून बंडखोरी करत बाहेर पडलेले अ‍ॅड.कोकाटे यांची थेट लायकी काढली. जिल्हा परिषदेला निवडून येण्याची पात्रता नाही ते निवडणूक लढविणार? असे म्हणत कोकाटेंवर निशाणा साधला.

First Published on: April 25, 2019 7:45 AM
Exit mobile version