गुन्ह्यात मदत; लाचखोर पोलीस हवालदार गजाआड

गुन्ह्यात मदत; लाचखोर पोलीस हवालदार गजाआड

सासरच्या मंडळींविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच बुधवारी (दि.9) दसक पोलीस चौकीत स्वीकारताना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. बी. डी. सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

सोनवणे यांची नेमणूक उपनगर पोलीस ठाण्यात आहे. पळसे (ता.नाशिक) येथील तक्रारदाराच्या पत्नीने पतीसह सासरच्यांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सोववणे याने मंगळवारी (दि.8) तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. बुधवारी दसक पोलीस चौकीत तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारातना पथकाने सोनवणे यास अटक.
First Published on: December 9, 2020 11:40 PM
Exit mobile version