एचडीएफसी कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहारचा इशारा

एचडीएफसी कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहारचा इशारा

तरसाळी : बागलाण तालुक्यातील शेतकर्‍यांना गंडवणार्‍या ‘एचडीएफसी’ बँकेचा संशयीत कर्मचार्‍यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मंगळवारपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास प्रहार शेतकरी संघटना बँकेच्या प्रवेशद्वारावर वाघ्या मुरलीसह साखळी उपोषण करेल, अशा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे व तालुका अध्यक्ष तुषार खैरनार यांनी दिला आहे. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले.

त्यानुसार अनेक शेतकर्‍यांना एचडीएफसी बँकेचा बनावट पावत्या देवून कर्जाची रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या खिशात ठेवणारा महाठग मेघणे याने जवळपास कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयीत आरोपी हा पसार झाला असून, अजूनहीतो सापडला नाही. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ४ ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला होता. पण अद्याप सटाणा पोलीसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. नेमके आरोपीला कोण पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फसवणूक झालेल्या शेतकरींनी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे व तालुका अध्यक्ष तुषार खैरनार यांची भेट घेऊन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. हा प्रकार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना सांगितला आहे. त्यांनी प्रहार स्टाईलने आंदोलन करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा , असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बँकेला 26 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा त्यानंतर बँकेच्या प्रवेशद्वारावर वाघ्या मुरळीसह बेमुदत उपोसणाचा इशारा दिला आहे.शेतकर्‍यांच्या प्रश्नी संघटना आक्रमक झालेली दिसते.

First Published on: October 16, 2021 10:04 AM
Exit mobile version