व्यायामाअभावी गरोदर मातांना सिझरची भीती

व्यायामाअभावी गरोदर मातांना सिझरची भीती

गर्भावस्थेमध्ये योगा करणे गर्भवती महिलेसह बाळाला फायदेशीर ठरते. गर्भावस्थेत योगा केल्याने शरीर आणि मनाला उत्साही ठेवण्यात मदत होते. योगासन केल्यामुळे गर्भवती महिलेचे शरीर क्रियाशील राहते. गर्भावस्थेत होणाऱ्या समस्येपासून बचाव करण्यासाठी योगासन केले पाहिजे. जर गर्भवती महिलाने रोज योगासन केले तर त्यांची प्रसुती नीट होऊ शकते.

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडण्यास बंदी घातल्यामुळे गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्री-अपरात्री त्रास झाल्यास त्यावेळी कोणत्या दवाखान्यात जायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. तसेच नियमित व्यायाम करणे शक्य होत नसल्याने सिझर होण्याची भीती बळावली आहे.

करोनामुळे छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्यांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. यात गरोदर मातांचाही समावेश झाल्याचे दिसून येते. त्यांना हलक्या स्वरुपाचा व्यायाम, मोकळ्या हवेत फिरण्याची आवश्यकता असते. मात्र, घराबाहेर पडण्याची भीती त्यांनाही वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत करोनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी घरात राहणेच पसंत केले असले तरी, आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यात प्रामुख्याने मनाप्रमाणे खाद्यपदार्थ मिळत नाही. अचानक काही त्रास झाला तर कोणत्या डॉक्टरकडे जायचे याविषयी त्यांच्या मनात धास्ती आहे. घराबाहेर पडता येत नसल्याने अनेक महिलांनी गच्चीवर हलक्या स्वरुपाचा व्यायाम सुरु केला. मात्र, पायर्‍या चढून जाण्याची रिस्क त्यांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे व्यायाम केला नाही तर सिझर तर करावे लागणार नाही? अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
&
महत्वाच्या समस्या
-दिवसभरात एक ते दीड किलोमिटर फिरायला जाण्याची सवय
-बाजारपेठ बंद असल्याने आहारात नाविण्याचा अभाव
– ’सिझर’व्दारे प्रसूती होण्याची भीती
-नियमित तपासणीसाठी दवाखान्यात जाण्याची समस्या
-डॉक्टरच वेळ देत नसल्यामुळे मोठी अडचण
– बाजारपेठ बंद असल्याने आवडीच्या पदार्थांचा तूटवडा

First Published on: March 26, 2020 6:05 PM
Exit mobile version