१७ हजार ट्रस्टची मालमत्ता होणार जप्त

१७ हजार ट्रस्टची मालमत्ता होणार जप्त

नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टची मालमत्तांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १७ हजार २०९ विश्वस्त संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जमा होणार आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ट्रस्ट, संस्थांची नोंदणी होत असते. यातील अनेक संस्था नियमानुसार ऑडिट रिपोर्ट आणि चेंज रिपोर्ट सादर वर्षानुवर्षे निष्क्रिय असतात, त्यांच्यामार्फत कोणतेच कामकाज होत नाही. मात्र त्या नोंदणीकृत असल्याने धर्मादाय आयुक्तालयावर निष्क्रिय संस्थांचा बोजा मात्र वाढतच असतो. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. राज्यातील ८ लाख १७ हजार ४१६ नोंदणीकृत संस्थांपैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार ३९६ संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. यात नाशिकच्या १७ हजार २०९ संस्थांचा समावेश आहे. अनेकदा नोंदणी रद्द झाल्यानंतर ट्रस्टची मालमत्ता सरकारजमा न होता या मालमत्तेला खासगी स्वरुप देत तिचा वापर केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

First Published on: July 10, 2021 11:58 PM
Exit mobile version