नाशिक महापालिकेत मानधनावर नोकर भरती; बुधवारी निर्णय

नाशिक महापालिकेत मानधनावर नोकर भरती; बुधवारी निर्णय

महापालिकेत अपुर्‍या मनुष्यबळाच्या मुद्याकडे अंगुलीनिर्देश करीत मानधनावर नोकर भरती करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. १७) होणार्‍या विशेष महासभेत सादर केला जाणार आहे.
पाच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला. त्यानुसार महापालिकेने १४ हजार ७०० कर्मचारी संख्येचा सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र त्यानंतरही भरती प्रक्रिया होऊ शकली नाही. पालिकेतील अस्थपणा विविध संवर्गातील एकूण ७ हजार ९० पदे मंजूर असून त्यापैकी सुमारे २४ हे पद रिक्त आहेत. त्यातच महापालिकेतून मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याचा ताण पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर येत आहे. दरम्यान, शहराचा दरवर्षी विस्तार होत असून लोकसंख्या देखील वाढ होत आहे. या तुलनेत शहराचा कारभार चालविणार्‍या पालिकेतील मनुष्यबळाचा अभाव भासत आहे. या पार्श्वभूमीवर मानधनावर भरती करण्याची मागणी सातत्याने होत आहे. महासभेने मानधनावर भरती प्रक्रियेस मान्यता दिल्यास अकरा महिने कालावधीसाठी कर्मचार्‍यांची भरती करण्यात येईल. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळाचा सामना करणार्‍या महापालिकेला दिलासा मिळेलच; शिवाय सत्ताधार्‍यांसह विरोधकांचा राजकीय हेतू देखील साध्य होईल.

 

First Published on: November 16, 2021 8:34 PM
Exit mobile version