देशव्यापी आंदोलनातून डॉक्टरांकडून हल्ल्यांचा निषेध

देशव्यापी आंदोलनातून डॉक्टरांकडून हल्ल्यांचा निषेध

हॉस्पिटल्ससह डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, या मागणीसाठी आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी (दि.१८) देशव्यापी आंदोलन केले. काळ्या फिती लावून आणि मास्क घालून डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली. नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टरांच्या या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

कोरोनादरम्यान अखंड रुग्णसेवा देणार्‍या काही डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसाचाराला, तसेच अवमानजनक वागणुकीला सामोरे जावे लागले. त्यातील काही घटनांमध्ये डॉक्टर्स आणि सहायकांना गंभीर दुखापत झाली. याशिवाय, रुग्णालयांचे तोडफोडीमुळे नुकसान झाले. या घटनांविरोधात शुक्रवारी (दि.१८) आयएमएतर्फे राष्ट्रीय स्तरावर निषेध दिन पाळण्यात आला. हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा पारित करावा, या मागणीचे निवेदन संघटनेतर्फे खासदार हेमंत गोडसे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले. यावेळी आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, सचिव डॉ. कविता गाडेकर, राज्य समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. किरण शिंदे, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, डॉ. प्रतिभा बोरसे, डॉ. पंकज भट उपस्थित होते.

आयएमएच्या मागण्या अशा

आंदोलनासाठी सर्व डॉक्टरांनी एकजुटीने सहभाग नोंदवला.

रम्यान, शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही सोशल मीडियावरुन या डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

First Published on: June 19, 2021 3:20 PM
Exit mobile version