पं. आनंद भाटे यांच्या अभंगवाणीने रसिक मंत्रमूग्ध

पं. आनंद भाटे यांच्या अभंगवाणीने रसिक मंत्रमूग्ध

नाशिक: सारडा उद्योग समूहाच्या शताब्दि सोहळ्यानिमित्त आयोजित संगीत फ्युजन व पं.आनंद भाटे यांच्या अभंगवाणी कार्यक्रमास रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. कालिदास कलामंदिरात आयोजित या संगीत पर्वणीला द्वीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. नाशिकच्या जेष्ठ कलाकारांनी सादर केलेला अनोख्या संगीताचा फ्युजन कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. कार्यक्रमात संवादिनी वादक पं. सुभाष दसककर, बासरीवादक मोहन उपासनी, गायक ज्ञानेश्वर कासार व आशिष रानडे, तबलावादक सुजित काळे व बल्लाळ चव्हाण, की बोर्ड वादक ईश्वरी दसककर, ऑक्टोपॅडवादक अभिजित शर्मा, सितारवादक प्रसाद रहाणे, मोहनवीणा वादक मानस गोसावी, बास गिटारवादक नीलेश सोनवणे, गिटारवादक संकेत बरडिया, जेमबे वादक उमेश खैरनार या कलाकारांनी कला सादर केली.

मध्यंतरानंतर सारडा उद्योग समूहाचा १०० वर्षांचा आलेख मांडणारी चित्रफीत दाखविण्यात आली. यानंतर सारडा उद्योग समूहाचे हर्षवर्धन सारडा यांनी श्रीमती किरणबाई सारडा कला केंद्र या सुसज्ज सेंटरच्या उभारणीची घोषणा केली. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. रूप पाहता लोचनी, इंद्रायणी काठी अशी भक्तीगीते सादर झाली. सुभाष दासक्कर (संवादिनी), नितीन वारे (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), अमित भालेराव (तालवाद्य) यांनी त्यांना साथसंगत केली. संगीताची अनोखी मेजवानी लाभल्याने रसिक तृप्त झाले होते. स्नेहसंवर्धन मंडळाच्या अध्यक्ष आर्या सारडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

First Published on: June 2, 2022 3:23 PM
Exit mobile version