मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल सिग्नलवर हॅप्प बसवा

मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल सिग्नलवर हॅप्प बसवा

मखमलाबाद रोड हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनू पाहात आहे. सुसाट वाहनांमुळे या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ड्रीम कॅसल सिग्नलवर तारवालानगर सिग्नलच्या धर्तीवर पालिका आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्प बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थायी समिती सदस्य कमलेश बोडके यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले.

पंचवटीतील मखमलाबाद रोड हा लिंक रोडला जोडला गेला असल्याने या रस्त्यावर दुचाकीसह चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे मोठी वाहने ही ह्याच रस्त्याने मार्गस्त होतात. परंतु या वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रीम कॅसल चौफुलीवर सिग्नल बसवण्यात आला आहे. मात्र सिग्नल वरून वाहने निघाल्यानंतर ती सुसाट सुटतात. त्यामुळे मखमलाबाद रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवडाभरात या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी आपले प्राण गमावले आहेत. यातच या रस्त्यावर दुभाजक नसल्याकारणाने सर्वसामान्यांना रस्ता ओलांडने अवघड होते.

यासाठी मखमलाबाद रोड रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी उंचवटा हँप्प यावे, अशी मागणी स्थानिक परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देऊन, वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. परिणामी, आणखी किती नागरिकांचे मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न नगरसेवक कमलेश बोडके यांनी केला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अन्यथा परिसरातील नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे

First Published on: September 19, 2020 1:45 PM
Exit mobile version