राज ठाकरेंनी खडसावले; ‘त्र्यंबक’ प्रकरणी गावकऱ्यांनी निर्णय घ्यावा, बाहेरच्यांनी…

राज ठाकरेंनी खडसावले; ‘त्र्यंबक’ प्रकरणी गावकऱ्यांनी निर्णय घ्यावा, बाहेरच्यांनी…

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याच्या घटनेनंतर झालेल्या वादावर ते म्हणाले की, वर्षानुवर्षांची परंपरा तिकडे सुरू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही आणि हा विषय तिथल्या संस्थानांचा आहे, तेथील गावकऱ्यांचा तो विषय आहे.

राज ठाकरे म्हणाले की, वर्षानुवर्षांची परंपरा सुरू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा विषय तिथल्या संस्थानांचा आणि गावकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिर आहे किंवा अशा अनेक मशिदी आहेत. जिकडे तुम्हाला वर्षानुवर्षे तिथे हिंदु-मुसलमान यातील सख्य दिसून येते. माहिममधील महदूम बाबाचा दर्गा आहे तिकडे त्या उरजावर जी चादर चढवली जाते ती माहिम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चादर चढवतो आणि अशी अनेक उदाहरणे माझ्याकडे दोनदिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्या गोष्टी चालू ठेवल्या पाहिजेत. इतर धर्माचा एखादा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका कमकुवत होणारा धर्म आहे का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

याआधी मी अनेक दर्गामध्ये, मशिदीमध्ये गेलो आहे. अनेक मुसलमान लोकं ज्या वेळेला मंदिरामध्ये येतात. उलट आपल्याच काही मंदिरामध्ये आपल्या जातीलाच गाभाऱ्यात दर्शन दिले जाते. त्यामुळे मला असं वाटतं की, माणसाची या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती जी आहे कोणती आहे ती छोटी आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या गोष्टीचा निर्णय घ्यावा. इतरांनी यात पडायची काही गरज नाही. असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल आपले मत व्यक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांवर केला.

त्र्यंबकेश्वरमधील वादानंतर हिंदु महासंघाने गोमुत्र शिंपडले, यावर बोलताना राजय ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, या वादात कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणे गरजेचे आहे. ज्या वेळेला मी भोंग्याचा विषय काढला किंवा माहिमच्या समुद्रातील अनधिकृत दर्गाबद्दल मी जेव्हा बोललो. तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत, त्यावर बोलायलाच पाहिजे. आमच्या गडकिल्यांवर जे दर्गे उभे आहेत ते हटवलेच पाहिजे. काय संबंध त्याचा महाराजांच्या गडकिल्यांवरती. ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी अनिकृत मशिदीबद्दल कलेक्टरशी बोलल्यावर ती तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजे. पण जाणूनबुजून काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.

 

First Published on: May 20, 2023 10:25 AM
Exit mobile version