Instagram वरील मैत्रीतून घडला धक्कादायक प्रकार; प्रियकराच्या भेटीसाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Instagram वरील मैत्रीतून घडला धक्कादायक प्रकार; प्रियकराच्या भेटीसाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, १७ वर्षीय अल्यवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर २७ वर्षीय तरुणाशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. प्रियकराच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने भावी आयुष्याचे सुखी स्वप्ने दाखवत बलात्कार केला. विशेष म्हणजे, आता ती गर्भवती आहे. याप्रकरणी पीडित मुलीने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी संशयित प्रियकर सुनील गोदीराम ठाकरे (रा.मातोश्री पार्क, श्रमिकनगर, सातपूर) यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुनील आणि अल्पवयीन मुलीची मैत्री इन्स्टाग्रामावर झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तो तिला भावी आयुष्यातील सुखी स्वप्ने दाखवू लागला. मैत्री केल्यानंतर त्याने ९ जानेवारी २०२१ रोजी तिला स्वत:च्या घरी भेटण्यास बोलवले. त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याला भेटण्यास आली. मात्र, त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकत तिच्या बलात्कार केला. त्यातून आता ती गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीसांनी संशयित सुनील ठाकरे यास अटक केली असून, त्याच्यावर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पाटील करत आहेत.

First Published on: June 16, 2021 1:11 PM
Exit mobile version