नाशिककरांसाठी दुर्मिळ शस्त्रे, नाण्यांचा खजिना खुला

नाशिककरांसाठी दुर्मिळ शस्त्रे, नाण्यांचा खजिना खुला

नाशिककरांसाठी दुर्मिळ शस्त्रे, नाण्यांचा खजिना खुला

जागतिक वारसा सप्ताहाअंतर्गत पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग संचालनालयतर्फे सरकारवाडा येथे प्रदर्शनाचा मंगळवारी रोजी शुभारंभ झाला. नागरिकांना आपल्याच भोवतालच्या परिसरात असलेल्या वारशाची माहिती व्हावी, दुर्लक्षित असलेल्या या वारशाचे जतन करण्यासाठी प्रेरणा मिळावी, या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदर्शनात ‘या’ वस्तू मांडण्यात आल्या

सरकारवाडा येथील प्रदर्शनात शस्त्रास्त्रे, पाषाण शिल्प, नाणी, रंगचित्र, छायाचित्र यांचा समावेश करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के, नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापुरकर, भारतीय सांस्कृतिक निधी नाशिक चॅप्टरचे योगेश कासार पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून वारसा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या सर्व ऐतिहासिक वस्तुंची निरखुन पाहणी करत त्याबद्दलची माहिती जाणून घेतली. नाशिक परिसरात आढळणारी दुर्मिळ शिल्पे, शस्त्रे, लाकडी, शिल्प, नाणी, उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तु या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे वैविध्यपूर्ण प्रदर्शन पाहण्यासाठी मंगळवारी शहरातील नागरिकांसह विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी मराठा शस्त्रास्त्र संग्राहक अनंत ठाकूर, ज्येष्ठ नाणी संग्राहक पुरूषोत्तम भार्गवे, संजय मोरे, विजय हिरण आदिंसह नाशिक सराफ असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेकावेळेचे होन नाणे पाहण्याची संधी

छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण नाण्याने शिवराज्य अभिषेक करण्यात आला. ते होन नाणे प्रदर्शनाचे ठेवण्यात आले आहे. दुर्मिळ असलेले हे नाणे पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करु लागले आहेत. १६७४ साली शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला. त्यावेळी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली होती. पौराहित्य करणार्‍या पंडीतांना महाराजांनी दक्षिणा म्हणून होन नाणे दिल्याचा उल्लेख आढळतो. या होन नाण्याला महाराजांच्या हाताचा स्पर्श असल्याने त्यास विशेष महत्व आहे, असे सोलापुर येथील होन संग्राहक किशोर चांडक यांनी सांगितले.

First Published on: November 19, 2019 9:19 PM
Exit mobile version