कर्नाटकचे बंडखोर आमदार पोलीस बंदोबस्तात साईचरणी

कर्नाटकचे बंडखोर आमदार पोलीस बंदोबस्तात साईचरणी

कर्नाटकचे बंडखोर आमदार पोलीस बंदोबस्तात साईचरणी

कर्नाटक विधानसभेचे काँग्रेस आणि जे. डी. एसचे १३ बंडखोर आमदारांनी शनिवारी (१३ जुलै) मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावत दर्शन घेतले. दरम्यान, आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले.

शनिवारी दुपारी १३ आमदारांचे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तत्पूर्वी, या आमदारांसाठी खास सुरक्षा यंत्रणचा ताफा खासगी विमानाने शिर्डी विमानतळावर दाखल झाला. यानंतर साधारणत: वीस ते पंचवीस मिनीटांनी स्पाईसजेट कंपनीच्या ७२ आसणी विमानाने १२ वाजून ५४ मिनिटांनी १३ आमदारांचे आगमन झाले. यानंतर सर्व आमदारांना शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी कडेकोट बंदोबस्तात नेण्यात आले. यावेळी या बंडखोर आमदारांना शिर्डीत खासगी वाहनाने नेतांना विमानतळावर युवक काँग्रेसच्या पंचवीस पदाधिकार्‍यांनी काँग्रेस पक्षाचे झेंडे दाखवून निदर्शने करत भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. साईमंदिरात या आमदारांचा ताफ्याचे आगमन होताच त्यांना बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने साईमंदिराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. या आमदारांनी साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे उपस्थित होते. दर्शनानंतर १३ आमदार संस्थानच्या चार नंबर गेटसमोरून विमानतळाकडे पोलीस बंदोबस्तात रवाना झाले. एकीकडे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष या बंडखोर आमदारांचे स्वागतासाठी थेट शिर्डी विमानतळावर हजर होते तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यासाठी विमानतळावर दाखल झाल्याचे नाट्य बघायला मिळाले.

First Published on: July 13, 2019 11:40 PM
Exit mobile version