येवल्यात राष्ट्रवादी सभासद नोंदणीस प्रारंभ

येवल्यात राष्ट्रवादी सभासद नोंदणीस प्रारंभ

येवला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सभासद नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली असून, पदाधिकार्‍यांनी येवला मतदारसंघात ५१ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पदाधिकार्‍यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे
विचार व ध्येयधोरणे पोहचवून सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

येवला मतदारसंघाचे निरीक्षक दिलीप खैरे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी शनिवार (दि. १२) रोजी येवला संपर्क कार्यालयात सभासद नोंदणी शिबिराचा प्रारंभ केला. संचालक जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, विधानसभा अध्यक्ष व बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, हरिश्चंद्र भवर, पंचयात समिती सदस्य मोहन शेलार, नगरसेवक दीपक लोणारी, जिल्हा नियोजन सदस्य ज्ञानेश्वर शेवाळे, दत्तात्रय डुकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, मकरंद सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे, किसनराव धनगे, विश्वासराव आहेर, पांडुरंग राऊत, सचिन कळमकर, बबन शिंदे, शिवाजी सुपर, संतोष खैरनार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: February 13, 2022 8:56 AM
Exit mobile version