दिलासा : रेमडेसिविर आता केवळ २३६० रूपयांत

दिलासा : रेमडेसिविर आता केवळ २३६० रूपयांत

रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये आता २,३६० रूपये या दराने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. नाशिक व मालेगावात निश्चित केलेल्याच मेडिकल्समधून या दराने हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकेल.

कोरोना आजारावर सध्या तरी ठोस औषधोपचार उपलब्ध झाले नसले तरी, या आजारातून रूग्ण बरा व्हावा याकरीता रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे कोरोना काळात या इंजेक्शनला मोठी मागणी आहे. रूग्णांकडून या इंजेक्शनला मागणी वाढल्याने या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचीही अनेक प्रकरणे राज्यभरातून समोर आली. त्यामुळे या इंजेक्शनच्या किंमतीवर अकुंश लावण्यासाठी शासनाने याचे दर निश्चित केले आहेत. सरकारी रूग्णायात उपचार घेणार्‍या रूग्णांसाठी हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाईल. मात्र खाजगी रूग्णालयात उपचार घेणार्‍या रूग्णांना हे इंजेक्शन योग्य दरात मिळावे याकरीता या इंजेक्शनचे दर निश्चित करण्यात आले आहे. नाशिकमध्ये हे इंजेक्शन २२४० रूपयांना मिळणार असून त्यावर पाच टक्के म्हणजे १२०रूपये जीएसटीसह त्याची किंमत २३६० रूपये असेल. इंजेक्शन दिल्यानंतर त्याची रिकामी बाटली औषध भांडारात जमा करावी लागणार आहे. खुल्या बाजारात या इंजेक्शनची किंमत सुमारे साडेपाच हजार रूपये इतके आहे मात्र काही ठिकाणी आठ ते २० हजार रूपये इंजेक्शन विक्रि केली जाते. मात्र इंजेक्शनच्या दरावर नियंत्रण आणल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार

इंजेक्शन मिळविण्यासाठी एक फार्म भरून द्यावा लागणार आहे. याकरीत संबधित रूग्णाची माहीती, प्रिस्क्रिपशन, कोविडबाधिताचा रिपोर्ट, आधारकार्ड ही सर्व कागदपत्रे घेउन रूग्णाच्या कुटुंंबीयांना जिल्हा रूग्णालयात जावे लागते. तिथे सर्व कागदपत्रे तपासून तेथील फार्मासिस्ट एक फॉर्म भरून संबधितांच्या हातात देतील. त्यानंतर रूग्णाच्या कुटुंबीयांनी तो अर्ज घेउन निर्धारित दोन मेडीकलपैकी कोणत्याही मेडीकलमध्ये गेल्यास त्यांना निर्धारित संख्येत इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

येथे मिळणार इंजेक्शन

सन मेडीकल, ठक्कर बाजार समोर, नाशिक
अशोका मेडीकल, कॅम्प रोड, मालेगाव

First Published on: October 26, 2020 11:22 PM
Exit mobile version