मोदी सरकार बदलणार नाही तोपर्यंत अर्धनग्न राहणार

मोदी सरकार बदलणार नाही तोपर्यंत अर्धनग्न राहणार

अर्धनग्न शेतकऱ्याशी संवाद साधताना शरद पवार.

शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने मोदी सरकार सत्तेवरुन पायउतार होत नाही, तोपर्यंत अंगात शर्ट न घालण्याचा संकल्प येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी सोडला. डोंगरे हे अर्धनग्न अवस्थेत बुधवारी, २४ एप्रिलला निफाडमधील शरद पवार यांच्या सभेत आले होते. याच अवस्थेत थेट व्यासपीठावर जाऊन त्यांनी शरद पवारांकडे आपला संकल्प बोलून दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या वेळी डोंगरे यांनी पवारांची भेट घेऊन आपल्या संकल्पाबाबत निवेदन दिले. सभास्थळी डोंगरे अर्धनग्न अवस्थेत फिरताना दिसताच स्वतः पवारांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून घेतले होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची मागणी लवकरच मान्य होणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, २३ मे नंतर मी आपल्याला शर्ट पाठवून देईल, असा शब्दही त्यांनी दिला.

First Published on: April 24, 2019 8:10 PM
Exit mobile version