व्दारका परिसरात ट्रॅफिक आयलॅण्ड काढून सिग्नल बसवणार

व्दारका परिसरात ट्रॅफिक आयलॅण्ड काढून सिग्नल बसवणार

द्वारका परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून मुंबईच्या धर्तीवर ट्रॅफिक आयलॅण्ड काढून याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक बी.एस. साळुंखे यांना शनिवारी (दि.२५) दिले. भुजबळ यांच्या कार्यालयात नाशिक शहरातील राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत येणार्‍या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली. यावेळी द्वारका सर्कल येथील वाहतुक सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा झाली. मुंबईमधील हाजी आली येथे ट्रॅफिक आयलॅण्ड असतांना तेथील वाहतुकीचा मोठा खोळंबा होत होता. वाहतूक तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर, तेथील हाजी आली येथे ट्रॅफिक आयलॅण्ड काढून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. परिणामी येथील वाहतुक खोळंबण्याचा प्रश्न मिटला. त्याचप्रमाणेे हाजी आलीच्या धर्तीवर द्वारका येथील सर्कल काढून नाशिक शहर पोलीस व राष्ट्रीय ग्रामीण महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वय साधून याठिकाणी तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, अशी सूचनाही भुजबळांनी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सारडा सर्कल उड्डाणपुलाचा अहवाल करणार
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या द्वारका सर्कल येथील वाहतुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी द्वारका पुलाच्या वरून जाणारा सारडा सर्कल ते नाशिक रोड फ्लायओव्हरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून शासनास पाठवावा असे आदेश त्यांनी दिले.

भुयारी मार्ग वाहनांसाठी खुला करा


द्वारका येथील भुयारी बोगद्याचाही वाहतुकीची समस्या कमी होण्यासाठी उपयोग झालेला नाही. आगामी काळात येथे पादचारी, रिक्षा, मोटार सायकल व छोटी वाहने जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी सूचनाही भुजबळांनी यावेळी केली.

यांचे प्रस्ताव तातडीने तयार होणार-

First Published on: January 25, 2020 5:47 PM
Exit mobile version