महसूल कर्मचारी सामुहीक रजेवर; कामकाज ठप्प

महसूल कर्मचारी सामुहीक रजेवर; कामकाज ठप्प

प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर विविध निवेदने देण्यात आली. प्रत्येकवेळी मागण्यांवर चर्चा होऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र अद्यापही मागण्या पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने केलेल्या आवाहनानूसार आज नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने सामुहीक आंदोलन पुकारले. कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. मुख्यालयातील सुमारे ३०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आज सकाळी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यानंतर निदर्शने करण्यात येउन निवडणूक उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर यांना निवेदन देण्यात आले.

शासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये शासनाने तत्वतः मान्य केलेल्या मागण्या सहा वर्षांचा कालावधी उलटूनही याबाबत अंमलबजावणी होउ शकली नाही. त्यामुळे संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात १६ ऑगस्ट रोजी लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार होते मात्र राज्यात निर्माण झालेल्या

पुरपरिस्थितीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आज एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येउन शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी महसूल कर्मचारी संघाचे सरचिटणीस नरेंद्र जगताप, सहसचिव योगेश कोतवाल, सरचिटणीस गणेश लिलके, दिनेश वाघ, रमेश मोरे, पी.वाय.देशपांडे, पी.डी.गोंडाळे, वंदना महाले, हेमंत पोटींदे, अरूण तांबे, आर.के.कोर, संतोष तांदळे, रा.ना.पर्वते आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.

५ सप्टेंंबरपासून बेमुदत संप

आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात ३१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येउन रक्तदान करून शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे तसेच ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

कार्यालयात शुकशुकाट

नेहमी गजबजणारे जिल्हाधिकारी कार्यालयात आज मात्र शुकशुकाट दिसून आला. कर्मचारयांच्या संपामुळे सर्व विभागांमध्ये शांतता दिसून आली तर जिल्हाधिकारी हे तालुका दौरयावर होते तर निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर हे देखील बैठकीनिमित्त मुंबई दौरयावर होते तर इतर वरीष्ठ अधिकारीही अनुपस्थित असल्याने निवेदन द्यावे कुणाला असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकारयांना पडला अखेर निवडणूक उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर यांना निवेदन देण्यात आले.

या आहेत मागण्या

First Published on: August 28, 2019 11:58 PM
Exit mobile version