घोड्याने फोडला मोबाईल, जबडाही तोडला

घोड्याने फोडला मोबाईल, जबडाही तोडला

प्रातिनिधीक फोटो

नाशिकरोडच्या जेलरोडवरील नारायण बापूनगर चौकात घोड्या उर्फ प्रवीण तोरवणे आणि त्याच्या साथीदारांनी एकाचा मोबाईल फोडला, तसेच दुसऱ्याचा जबडा तोडल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत.

नारायण बापू नगर येथे राहणारा अमित रमेश उगले हा तरुण शनिवारी सायंकाळच्या सुमारास मित्रांसमवेत चौकात उभा असताना तेथे प्रविण तोरवणे उर्फ घोड्या व त्याचे अन्य दोन मद्यपी साथीदार आले. त्यांनी अमितच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ केली. अमितने त्यांच्याकडून आपला मोबाईल परत घेण्याचा प्रयत्न करताच घोड्याने हा मोबाईल रस्त्यावर आदळून फोडला, तसेच, त्याच्याजवळील लाकडी दंडुक्याने अमितला मारहाण करत अमितचा जबडा तोडला. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास तुला बघून घेऊ, असा दम देत सर्व हल्लेखोर फरार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: February 3, 2019 3:34 PM
Exit mobile version