साई भंडाऱ्यातील पैशांच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर दगडफेक

साई भंडाऱ्यातील पैशांच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर दगडफेक

प्रातिनिधीक फोटो

अंबड-लिंकरोड भागात साई भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मंडपाच्या पैशांवरुन उद्भवलेल्या वादातून बुधवार, २३ जानेवारीला मनसेच्या पदाधिकाऱ्यालयावर दगडफेक झाली होती. सामंजस्याने हा वाद परस्पर मिटविण्याचे काहींचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने, हा वाद अखेर पोलिसांत पोहोचला.

अंबड पोलिसांत मनसेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर विठ्ठल बागडे यांनी कार्यालय फोडल्याप्रकरणी बंटी वाघ याच्याविरुद्ध तक्रार केली. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी अंबड-सातपूर लिंकरोडवरील ज्ञानेश्वर बागडे यांच्याकडे पैशांची मागणी करतानाच त्यांना शिवीगाळ करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. किरकोळ कारणावरुन दगडफेक झाल्याने चुकून हा दगड कार्यालयाच्या खिडकीला लागून काच फुटल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होती. तसेच, पोलिसांपर्यंत न जाता सामंजस्याने हा वाद मिटविण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, हे प्रयत्न फोल ठरल्याने अखेर हा वाद अंबड पोलिसांपर्यंत गेला. याप्रकरणी अंबडचे पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू आहे.

First Published on: January 24, 2019 11:11 PM
Exit mobile version