कोल्हापूर-सातारा गादीत गोडवाच, संभाजीराजेंनी शब्द केला खरा

कोल्हापूर-सातारा गादीत गोडवाच, संभाजीराजेंनी शब्द केला खरा

खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोमवारी (दि.२८) नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. या भेटीमुळे मराठा आंदोलनाच्या नेतृत्त्वावरनं भांडणं लावणार्‍यांना मात्र चांगलाच चाप लागलाय. दोनच दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी सातारा आणि कोल्हापूर गादीत कुठलंही वितुष्ट नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आजच्या भेटीतनं त्यांनी त्यांचा शब्द खरा असल्याची प्रचिती दिली. मराठा आंदोलनात सातारा आणि कोल्हापूर या दोन्हीही गाड्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे त्यावरुन उगाचच कुरापती काढून भांडणं लावणार्‍यांना त्यांनी चांगलाच दणका दिलाय.

खासदार संभाजीराजे दोन दिवसांपासून नाशिक दौर्‍यावर आहेत. मनीषा राजे यांच्या आग्रहास्तव सोमवारी सकाळी ते नाशिकमध्ये राहणार्‍या मनीषा राजेंच्या घरी पोहोचले. त्यांनी मनीषा राजेंची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, नाशिकमध्ये 26 सप्टेंबर रोजी मराठा समाजाची राज्यस्तरिय बैठक झाली. या बैठकीला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते. सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे उगाच भांडणेे लावणार्‍यांना ठोका, असा आदेशच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समर्थकांना दिले आहेत. सर्व मराठा संघटना एकत्र या, आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करू आणि वेगवेगळे दबाव गट तयार करू, असेही संभाजी राजे यांनी सांगितलं. मराठा आंदोलकांनी भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असं आवाहन देखील संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथील मराठा आंदोलनाच्या केले होते.

First Published on: September 28, 2020 3:52 PM
Exit mobile version