शाळा जुलैमध्ये नाही तर सप्टेंबरमध्ये सुरु होतील

शाळा जुलैमध्ये नाही तर सप्टेंबरमध्ये सुरु होतील

नाशिक : राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यासाठी नेमलेल्या बदली समितीला नव्याने संगणकीय सॉफ्टवेअर बनविण्यास सूचना दिली आहे. तसेच शाळा जुलैमध्ये नाही तर सप्टेंबर महिन्यात सुरु होतील, असे आश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. नाशिकच्या शिक्षकांनी शनिवारी (दि.27) त्यांची भेट घेवून निवेदन दिले.

राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सूरू करण्याबाबत शिक्षक व पालकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलैमध्ये शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्यासारखे होईल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली. यावर ग्रामविकास मंत्री मुश्रीम यांनी सप्टेंबरमध्ये शाळा सुरु करणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्यांविषयी चर्चा केली. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्यात येत आहे. जुलैअखेर बदल्या केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शिक्षक बॅकेचे चेअरमन नामदेव रेपे, संचालक सुभाष अहिरे आदींनी भेट घेऊन चर्चा केली.

First Published on: June 27, 2020 6:51 PM
Exit mobile version