सेल्फी, सखी, प्रबोधन आणि उत्साह

सेल्फी, सखी, प्रबोधन आणि उत्साह

सखी मतदान केंद्रांमध्ये मतदारांना आवश्यक माहिती दिली जात होती. तसेच, मतदानानंतर केंद्रांबाहेर सेल्फीचा उत्साह कायम होता.

मतदानासाठी आलेल्या नवमतदारांचा प्रतिसाद आणि या क्षणाला सेल्फीत बंद करण्यासाठीचा उत्साह… सखी मतदान केंद्रांवर महिलांचे होणारे स्वागत… विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींकडून होणारे मतदारांचे प्रबोधन अशा वातावरणात सोमवारी, २९ एप्रिलला मतदानाला सुरुवात झाली. तांत्रिक बाबींचा अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचा प्रतिसाद दिसून आला.

सखी मतदान केंद्रांबाहर अशी आकर्षक रांगोळी काढलेली होती.
काही केंद्रांवर मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
First Published on: April 29, 2019 10:04 AM
Exit mobile version