कारवाईच्या धास्तीने मालकांनीच काढले कत्तलखान्याचे पत्रे

कारवाईच्या धास्तीने मालकांनीच काढले कत्तलखान्याचे पत्रे

संगमनेर : नगरपालिका आणि पोलीस प्रशासन कत्तलखाने आता पाडतीलच, या कारवाईच्या भितीने होणारे नुकसान टाळण्यासाठी शहरातील अनधिकृत कत्तलखान्यांच्या मालकांनी स्वतःहून आपापल्या कत्तलखान्याच्या वाड्यांवरील सर्व पत्रे हटविले. भिंती मात्र आहे तशाच स्थितीत उभ्या आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप तरी पालिकेकडून कोणतीच हालचाल सुरु झालेली दिसून येत नाही. अतिक्रमण विभागाला या कारवाईबाबत अद्यापही कुठलेही आदेश नसल्याबाबतची खात्रीलायक माहिती आहे.

संगमनेर शहरातील जमजम कॉलनीतील पाच अनधिकृतरित्या सुरू असणारे कत्तलखाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीच संगमनेरमधील गोवंश कत्तलखान्यांवर छापे टाकत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कत्तलखान्यांच्या सात मालकांवर महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी आणि प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन दोघांना अटकही करण्यात आली.

गोवंशाची कत्तल होत असल्याच्या मुद्द्यावरुन विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले अखेर आंदोल नकर्त्यांपुढे नमते पणा घेत त्याच दिवशी कारवाई झालेल्या पाचही कत्तलखान्यांना ‘सील’ ठोकून 48 तासांच्या आत अनधिकृत असणारे कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची लेखी हमी देत त्याच दिवशी रात्री पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जमजम कॉलनीत जावून अनधिकृत असलेले’ पाचही कत्तलखाने सील करण्याची कारवाई केली.
जमजम कॉलनीत असणारे अनधिकृत असणारे कत्तलखान्यांच्या मालकांनी आपआपले कत्तलखाने पाडले जातील या भीतीने मंगळवारी मध्यरात्रीच कत्तलखान्यांच्या मालकांनी वाड्यांवरील पत्रे हटविले. आता तेथील कत्तलखान्यांच्या केवळ वाड्यांच्या भिंती उभ्या आहेत. त्या पाडण्याची जबाबदारी पालिकेची असून, त्याबाबत पालिकेकडून अद्यापही कोणतीच हालचाल झाली नसल्याचे दिसून येत आहे.

कारवाई न केल्यास मोर्चा

संगमनेर शहरातील जमजम कॉलनीत असणारे अनाधिकृत कत्तलखाने दोन दिवसात तोडण्याची कारवाई करणार असल्याचे लेखी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी तहसीलदार अमोल निकम यांच्यामार्फत दिले आहे. जर दोन दिवसांत अनाधिकृत असलेले कत्तलखाने तोडले नाहीतर नगरपालिकेवर मोर्चा नेऊन मुख्य अधिकार्‍यांना जाब विचारणार आहे, असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी दिला आहे.

First Published on: October 7, 2021 7:08 PM
Exit mobile version