धक्कादायक : देशसेवेची संधी मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

धक्कादायक : देशसेवेची संधी मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

सैनिक होऊन देशाची सेवा करावी, असे मनाशी पक्के ठरवून त्यादृष्टीने १२ वेळा मित्रांसमवेत सैन्य दल भरतीचे प्रयत्नही केले. मात्र, नशिबी भरती होता न आल्याने, स्वप्नाच्या दिशेने वाटचाल होत नसल्याने व देशसेवेची संधी मिळत नसल्याने मेंढी वडांगळी (ता.सिन्नर) येथील २२ वर्षीय तरुणाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी घडली. याप्रकरणी एमआडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. समाधान दगू म्हस्के असे मृताचे नाव आहे.

सैनिक होऊन देशसेवा सेवा करण्याची संधी मिळावी, ही देशभरातील प्रत्येक तरुणांसाठी आभिमानाची बाब असते. त्यासाठी ते जीवापाड मेहनत करतात. त्याप्रमाणे समाधान म्हस्के याने बालपणापासून सैन्य दलात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगळले होते. त्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेत होता. देशभरात सैन्य दलाची भरती कोठेही असो तो मित्रांसमवेत जायचा. नुकतीच त्याने मुंब्रा येथील सैन्य दलाची भरती केली होती. मात्र, त्या भरतीचा निकाल समाधानकारक लागला नाही. तो भरती झाला नाही.

सैन्य दलात भरती होण्यासाठी त्याने १२ भरतींमध्ये सहभाग घेतला होता. चार जीवलग मित्रांसमवेत त्याची मुंब्रा येथे झालेल्या सैन्य दलाच्या भरतीत निवड झाली. मात्र, भरतीचा अंतिम निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने त्याला भरती होता आले नाही. त्यातून तो ताणतणावाखाली आला होता. गुरुवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता आई-वडील शेतात गेल्यानंतर त्याने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. पुढील तपास एमआयडीसी सिन्नर पोलीस करत आहेत.

भरती न झाल्याने सोडले जेवण
समाधान म्हस्के हा न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी महाविद्यालयातून बारावी सायन्स उत्तीर्ण आहे. सैन्य दलात भरती होण्यासाठी तो सहा वर्षापांसून प्रयत्न करत होता. त्याने १२ वेळा भरतीसाठी प्रयत्न केला. मुंब्रा (मुंबई) येथील चार जीवलग मित्रांसह त्याने मैदानी चाचणी उत्तीर्ण झाला. मात्र, तो लेखी परिक्षेत नापास झाला. त्यातून तो ताणतणावाखाली आला होता. त्याने दोन दिवसांपासून जेवण सोडले होते. मोबाईलसुद्धा बंद ठेवला होता. त्याची मोलमजुरी करते तर वडील शेती करतात.

First Published on: February 13, 2020 3:03 PM
Exit mobile version