काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी

काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी

काळ्या जादुसाठी दुतोंड्या मांडूळ सापाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोनजणांना मांडूळ, कारसह नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने म्हसरुळ शिवारात अटक केली. त्यांना बुधवारी (दि.१६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन जणांना दोन दिवसांची कोठडी सुनावली. 

पिराजी ज्ञानबा किर्ते (३०), वैज्यनाथ बालाजी सोनटक्के (३०, दोघेही रा. परळी, जि.बीड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. मांडूळ तस्करीसाठी म्हसरुळ शिवारात चार जण येणार असल्याची माहिती वनपाल मधुकर गोसावी यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना दिली. त्यानुसार साध्या वेशात वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, गोविंद पंढरे, रोहिणी पाटील, विजयसिंग पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशयित चौघे कारमधून (एम.एच.०४ जीडी ५८४६) पेठरोडवर-म्हसरूळमध्ये आले. त्यांनी कारच्या डिक्कीतून बादली काढून ती एका रखवालदाराच्या घरात नेली. घरात चौघांनी मांडूळचे वजन, चित्रीकरण व छायाचित्रे काढली. चौघांनी छायाचित्रे, चित्रीकरण संबंधित खरेदीदाराला पाठविली. पिराजी किर्ते, वैजनाथ सोनटक्के हे कारमध्ये बसण्यासाठी आले असता पथकाने त्यांना अटक केली. दोन जण मांडूळाची बादली घरात सोडून अंधारा पसार झाले.

First Published on: October 16, 2019 10:21 PM
Exit mobile version