सपकाळ हबप्रश्नी अखेर तोडगा

सपकाळ हबप्रश्नी अखेर तोडगा

सपकाळ हबप्रश्नी अखेर तोडगा

सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ग सुरू करण्याबरोबरच प्राध्यापकांचे वेतन देण्याचे संस्थाचालकांनी आश्वासन देत हा प्रश्न निकाली काढला. मुंबई येथे तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयात यांसदर्भात बैठक घेण्यात आली. सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

मुंबई येथे तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांच्याकडे आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीस सहसंचालक नाठे, संस्थाचालक रवींद्र सपकाळ, संचालक बी.बी.रायते, प्रा.बागल, प्रा.फरतरे, प्रा.गोंदकर, भाजपाचे सुनील देसाई, सुनील थोरात उपस्थित होते. त्र्यंबकरोडवर असलेले सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले होते. तसेच वर्षभरापासून पगार न झाल्याने हबमधील 250 प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली होती.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक नुकसान होउ नये म्हणून अन्य महाविद्यालयांमध्ये समायोजित करावे अशी मागणी केली होती तर प्राध्यापकांच्याही वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या बैठकित प्राध्यापकांचे वेतन, पीएम, तसेच विद्यार्थ्यांचे तास नियमित होतील असे आश्वासन दिले. तंत्रशिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ हे संस्थेकडे पुढील काळात व्यक्तीशः लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी ऋषिकेश रणसिंग, चिन्मय जोशी, फड आदिंसह विध्यार्थीही उपस्थित होते.

First Published on: July 11, 2019 3:09 PM
Exit mobile version