नामपूरला ट्रकच्या धडकेत आईसह मुलगा ठार

नामपूरला ट्रकच्या धडकेत आईसह मुलगा ठार

अपघात

नामपूर येथील मालेगाव- नामपूर रस्त्यावर भरधाव इंडियन गॅस सिलिंडरच्या ट्रकने दुचाकीला उडविल्याने महिला व दहा वर्षाच्या मुलगा जागीच ठार झाला. तर पती व चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गुरूवारी (७ मार्च) साडेबाराच्या सुमारास समीर शब्बीर शेख हे कुटुंबियांसह मालेगावहून दुचाकीवरून (एमएच ४१- ए- ६५०८) नामपुरकडे येताना अंबासन फाट्यानजीक इंडियन गॅस सिलिंडरचा ट्रक (एमएच- ०४- ९६७७) ने धडक दिली. ट्रकने जोरदार उडवल्याने दुचाकीवरील सुरैया समीर शेख (वय २९) व मुलगा अविश शेख (वय १०) हे जागीच ठार झाले. पती समीर शेख (वय ३८) व चार वर्षीय मुलगी जोया शेख गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तत्काळ मालेगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, दिपक भगत यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

First Published on: March 7, 2019 10:07 PM
Exit mobile version