सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे विशेष नियोजन

सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे विशेष नियोजन

श्रीधर गायधनी

उन्हाळी सुट्यांमध्ये रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई, बरौनी, वाराणसी आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले असून या रेल्वे गाड्यांना नाशिकरोड स्थानकावर सुट्यांच्या कालावधीकरीता थांबा देण्यात आला आहे. ज्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गैरसोय टळण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांना जलद सेवा उपलब्ध होईल.

मुंबई एलटीटी-बरौनी साप्ताहिक (०११३३) विशेष सुपर फास्ट गाडी ११ मार्च ते ४ जुलैदरम्यान धावेल. तिच्या १३ फेर्‍या होतील. ही गाडी एलटीटीहून ०५.१० वाजता सुटेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावऴ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, इलाहाबाद छिओकी जंक्शन, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन बक्सर, आरा, पाटलीपुत्र एवं हाजीपूर येथे थांबा असेल. एलटीटी-वाराणसी साप्ताहिक विशष गाडी (८२१०१) एलटीटीहून प्रत्येक सोमवारी मध्यरात्री पाऊणला सुटेल. ८ मार्च ते १ जुलैदरम्यान ती अकरा फेर्‍या करेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावल,खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहबाद छियोंकी जंक्शन येथे थांबेल. मुंबई सीएसटीहून मुंबई-नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी (०२०२१) प्रत्येक रविवारी सव्वाबाराला सुटेल. १४ मार्च ते ३० जूनदरम्यान ती १२ फेर्‍या करेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापुर, बडनेरा, चांदूर, धामणगांव आणि वर्धा येथे तिला थांबा आहे.

मुंबई सीएसटीवरून मुंबई -नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी (०१०७५) प्रत्येक सोमवारी रात्री साडेअकराला सुटेल. १५ मार्च ते १ जुलैदरम्यान ती बारा फेर्‍या करेल. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड,जऴगाव, भुसावऴ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगांव, पुलगांव व वर्धा येथे ती थांबेल. परतीच्या प्रवासातही या गाड्या ठरवून दिलेल्या वरील स्थानकांवर थांबणार आहेत. सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेला असणारे प्राधान्य आणि त्यामुळे स्थानकांवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने या गाड्यांना थांबा देण्याचे तसेच विशेष गाड्यांचे नियोजन केले असून, यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

First Published on: March 31, 2019 10:58 PM
Exit mobile version