महिला तक्रार निवारण समितीवर रहाटकर नाराज

महिला तक्रार निवारण समितीवर रहाटकर नाराज

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थेत काम करणार्‍या महिलांच्या तक्रारी निवारण समिती असते. मात्र समितीच्या सदस्यांच्या उदसीन धोरण आणि कारभारमुळे महिलांच्या तक्रारीचे निवारण होत नसल्याची खंत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. या वेळी निवारण समितीकडे जिल्हाभरातील ६३ तक्रारी सायंकाळपर्यंत दाखल झाले.

पीडित महिलांना जलदगतीने त्यांच्या जिल्ह्यातच न्याय मिळावा यासाठी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने ‘आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात राबविला. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महापौर सिमाताई भोळे, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपजिल्हाधिकारी पुनवर्सन शुभांगी भारदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर उपस्थित होते. तसेच जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील संरक्षण अधिकार्‍यांनी कौटुंबिक हिंसाचाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस स्टेशन व समुपदेशन केंद्रात जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सुचनाही रहाटकर यांनी संबंधितांना दिल्यात. महिला आयोगाचा सध्या उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू ठिकठिकाणी जनसुनावणीचे आयोजन होत आहे.

भविष्यात तालुकास्तरावर जनसुनावणी

जनसुनावणीमुळे महिलांमध्ये समुपदेशन करुन त्यांचे मतपरिवर्तन होण्यास मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभत असून भविष्यात तालुका स्तरावर जनसुनावणी घेण्याचा आयोगाचा मानस असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले.

First Published on: January 6, 2019 7:09 AM
Exit mobile version