वाघेरा घाटात दरड कोसळली

वाघेरा घाटात दरड कोसळली

त्र्यंबक वाघेरा संपूर्ण रस्त्यावर आडवे पडलेले झाड आणि दरड

संततधार पावसाने त्र्यंबक तालुक्यातील वाघेराहरसूल घाट मार्गावर आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दरड कोसळली; बांधकाम विभागाशी संपर्क झाल्यानंतर जेसीबी च्या सहाय्याने झाडे आणि दरड बाजूला करून हा रस्ता आता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे.

बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्या परस्परातील समनवयाच्या अभावाने या भागात नेहमीच असे प्रकार घडत असतात. रस्त्या लगतचा डोंगर उताराचा भाग हा वन विभागात येत असून वन खाते येथे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला परवानगी देत नाही त्यामुळे गेल्या तीन दिवसात चार वेळा हा रस्ता बंद झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदरशींनी दिली.

जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभागांना सतर्कतेचे आदेश दिलेले असतांनादेखील वन विभाग आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय होत नसल्याने या भागातून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

First Published on: August 5, 2019 5:02 PM
Exit mobile version