वेतन थकल्याने ‘वसाका’ बंद

वेतन थकल्याने ‘वसाका’ बंद

वसाका कारखान्यासमोर आंदोलन करताना कर्मचारी.

वसाका कारखाना चालू वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला आहे. कारखाना चालू करण्याआधी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राममंदिर येथे झालेल्या कामगार बैठकीत २०१७- १८ सालचा थकीत पगार देणे संदर्भात घोषणा केली होती. मात्र, त्या प्रमाणे कारखाना व्यवस्थापणाने फक्त एकच पगार अदा केला. उर्वरीत पगार देणे संर्दर्भात टाळाटाळ केली जात असल्याने कामगारांनी मंगळवारी दुपारी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला व काम बंद पाडले. जोपर्यंत थकीत पगार संदर्भात व इतर मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कारखान्याचे उत्पादन बंदच ठेवले जाईल अशी माहिती वसाका कामगारांनी दिली. यावेळी साखर कामगार युनियनचे अध्यक्ष, अशोक देवरे, रविंद्र सावकार, विलास सोनवणे, कुबेर जाधव, त्र्यंबक पवार, नंदु जाधव, विक्रम जाधव, बापु देशमुख, आनंदा गुंजाळ, आनंदा देवरे, धनशिंग जाधव, नंदु सोनवणे उपस्थित होते.

संचालकाचा काढता पाय

कारखान्याचे उत्पादन सुरु असताना कारखान्याचे जनरल मॅनेजर व प्रशासकीय प्रमुख व संचालक कारखाना कार्यस्थळाहुन काढता पाय घेतला. फक्त कांबळे हे संचालक वसाका कार्यस्थळी हजर असल्याचे कामगारांनी सांगितले. कांबळे यांनी कामगारांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क करुन तडजोडीची मागणी केली असता एक तारखेला नियमीत पगार व एक थकित पगार देतो असे सांगितले. परंतु जोपर्यंत थकीत पगार देत नाही तोपर्यंत कारखाना चालु देणार नाही, अशी ठाम भुमिका घेतली उत्पादन बंद पाडले.

First Published on: January 23, 2019 5:57 PM
Exit mobile version