मालेगाव एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य करणार, सुभाष देसाईंची ग्वाही

मालेगाव एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य करणार, सुभाष देसाईंची ग्वाही

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिली. उद्योग नियमावलीप्रमाणे वस्त्रोद्योग पार्क आणि अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे  सुभाष देसाई यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. मालेगाव येथील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक  ३ येथील प्रलंबित कामाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पी. अन्बलगन, सहसचिव संजय देगांवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर,  अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या दादाजी भुसे यांनी यावेळी मांडल्या. त्यांनी मालेगाव येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत. वस्त्रोद्योग पार्क आणि अजंग टप्पा क्रमांक ३ भुखंड वाटपाच्या ६००  रुपये प्रति चौ. मी. या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यानंतर ७९० प्रमाणे दर करण्यात यावेत. जे प्रकल्प काम सुरू करत आहेत, त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी तांत्रिक मंजुरी तसेच निविदा प्रक्रियेची प्रक्रिया करण्यात यावी, असे देसाई यांनी सांगितले.

वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात वीज व्यवस्था करून ऊर्जा विभागासोबत पाठपुरावा करून वीजेसाठी सबस्टेशन कार्यान्वीत करावेत. प्लास्टिक, वस्त्रोद्योग, अन्न आणि इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश सुभाष देसाई  यांनी बैठकीत दिले.


हेही वाचा – २ दिवसांत आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

First Published on: January 10, 2022 9:38 PM
Exit mobile version