वेतन आयोगाचा प्रस्ताव महासभेवर सादर करा : विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते

वेतन आयोगाचा प्रस्ताव महासभेवर सादर करा : विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते

MNC

राज्य मंत्रीमंडळाने राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांमधील अधिकारी-कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर नाशिक महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापौरांनी सत्वर जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजूर करून तत्काळ शासनाकडे पाठवा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर नाशिक महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेतील सुमारे पाच हजार अधिकारी-कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ होणार असून त्यांच्या विद्यमान वेतनात तब्बल १८ ते २३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. राज्य शासनाने वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली असली तरी, त्यासाठी महासभेत ठराव करणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेतील कर्मचार्‍यांनाही तत्काळ सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. पालिकेतील कर्मचारी अगोदरच कमी मनुष्यबळात काम करत आहेत. तरीही त्यांना वेतन आयोगासाठी संप केलेला नाही. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची तत्काळ घोषणा करून नवी भेट द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

First Published on: July 24, 2019 8:41 PM
Exit mobile version