गळफास घेवून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

गळफास घेवून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

घरात कोणी नसल्याची खात्री करत एका अल्पवयीने मुलीने खोलीतील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना जुना कुंभारवाडा, संत गोरीबा चौक, जुने नाशिक येथे घडली.

याप्रकरणी आदित्य राजेंद्र गायकवाड यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. प्रतिक्षा शशीकांत गायकवाड (१६, रा. जुना कुंभारवाडा,भद्रकाली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.प्रतिक्षा ही आदित्य गायकवाड यांची पुतणी आहे. शशीकांत गायकवाड व आदित्य गायकवाड शेजारी-शेजारी राहतात. शशीकांत गायकवाड यांच्या घरी कोणी नसताना प्रतिक्षाने गळफास घेत आत्महत्या केली. आदित्य गायकवाड हे शशीकांत गायकवाड यांच्या घरी आले तेंव्हा प्रतिक्षाने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पुढील तपास पोलीस हवालदार ठाकरे करीत आहेत.

First Published on: April 13, 2019 10:20 PM
Exit mobile version