अपना घर दुर्घटना : सुजॉय गुप्तांची उच्च न्यायालयात धाव

अपना घर दुर्घटना : सुजॉय गुप्तांची उच्च न्यायालयात धाव

सुजॉय गुप्तांच्या अर्जावर उद्या निर्णय

ध्रुवनगरमधील सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी फुटून चार कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अपना घर गृहप्रकल्प दुर्घटनेत पाण्याच्या टाकीसाठी महापालिका नगररचना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप पोलिसांच्या हाती सुजॉय लागलेला नाही. पोलिसांनी ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे, नारायण कडलग यांना अटक केली आहे. गुप्ता फरार आहेत. गुप्ता यांच्या वतीने अ‍ॅड.जयदीप वैशंपायन कामकाज पाहत आहेत.

अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर मंगळवारी (ता.९) जिल्हा न्यायालयाने गुप्तांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे अ‍ॅड.वैशंपायन यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

First Published on: July 12, 2019 9:22 PM
Exit mobile version