राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत टीएसटीएचे वर्चस्व

राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत टीएसटीएचे वर्चस्व

नाशिक – ८३ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत २१ वर्षाखालील मुलांच्या गटात पहिला मानांकित ए. रेगन याने टीएसटीएच्या अक्षय पिसाळचा अपेक्षेप्रमाणे ११-६, ११-९, ११-८, १५-१७, ११-६ असा ४-१ ने पराभव करून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला तर दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याच्या ७ व्या मानांकित जितेंद्र यादव याने ठाण्याच्याच दिद्धेश सावंत चा अटीतटीच्या सामन्यात१२-७, ७-११,९-११, १४-१२, ८-११, १२-८, ११-४ असा ४-३ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अनुभवी रेगनने ठाण्याच्या जितेंद्र यादवचा सहजपणे ११-९, १०-१२, ११-, ११-३, ११-३ असा ४-१ पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

२१ वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित टीएसटीएची रीशा मिरचंदाणी हिने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी ठाण्याच्या आर्या संगेडकरचा एकतर्फी झालेल्या सामन्यात ६-११, १६-१४,११-४, ११-५, ११-९ असा ४-१ ने पराभव करून आपली अंतिम फेरीतील घोडदौड चालू ठेवली, तर दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यातील ठाण्याच्या ७वी मानांकित इशा चव्हाणने आपल्याच जिल्ह्याच्या आद्यश्री जोगचा ११-८, ७-१२, ११-५, ११-९, ११-८ असा ४ वि १ गेमने पराभव करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. परंतु, तो आनंद फार काळ टिकवता आला नाही. टीएसटीएच्या रीशा मीरचंदानीने ठाण्याच्या इशा चव्हाणविरुद्ध ११-७, ११-९, ११-९ असे सरळ तीन गेम घेऊन दबाव कायम ठेवला.

चौथ्या गेममध्ये १०-७ असे इशा चव्हाणकडे लीड असतांना मिरचंदाणी हिने सरळ ३ पॉईंट घेऊन १०-१० अशी बरोबरी साधली आणि शेवटी १५-१३ असा सामना जिंकून ४-० असा विजय मिळवून २१ वर्षाखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवून सुवर्णपदक पटकावले तर इशा चव्हाणला रजत पदकावर समाधान मानावे लागले. २१ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटाचे विजेतेपद सबअर्बन टेबल टेनिस असोसिएशन मुंबईने राखत दोन्ही सुवर्णपदके नावे केली.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ भूषण पटवर्धन, सोनी गिफ्ट्सचे नितीन मुलतानी, राज्य संघटनेचे सचिव यतीन टिपणीस, सी. आर. शहा, विभागीय सहनिबंधक, नाशिक विभाग व ज्येष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिसपटू प्रकाश केळकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस यांनी जिल्हा टेबल टेनिस संघटनेने कोविडची परिस्थिती असतांनाही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून खेळाडूंसाठी या स्पर्धांचे आयोजन केलयाबद्दल अभिनंदन केले.

संघटनेचे अध्यक्ष नरेन्द्र छाजेड यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन मिलिंद कचोळे यांनी केले. याप्रसंगी संजय मोडक, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, सतीश पिंगळे, लोणारे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिमखाना तसेच विश्वास को. ऑप बँक लि., नाशिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. पुरुष व महिला एकेरीच्या सामन्यांना सुरवात झाली आहेत. बक्षीस समारंभ ६ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता होईल.

First Published on: October 5, 2021 11:05 PM
Exit mobile version