शिक्षक म्हणतात महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवा

शिक्षक म्हणतात महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवा

नाशिकl करोनाचा प्रादुर्भाव दीर्घ काळासाठी राहणार असल्याने सामाजिक अंतर राखूनच शाळा सुरू ठेवण्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दोन सत्रात भरविण्याची मागणी करत शाळांचा हा ‘कर्नाटक पॅटर्न’ महाराष्ट्रातही सुरु करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी 7.50 ते दुपारी 12.20 आणि 12.10 ते सायंकाळी 5 या दोन वेगवेगळ्या सत्रात भरविण्याचे नियोजन केले आहे. मात्र शाळा केव्हापासून प्रारंभ होणार, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. 5 मे रोजी शिक्षण खात्याच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वेळापत्रकाबाबत चर्चा करण्यात आली होती. आता कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालकांनी शाळांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासंबंधी मार्गसूची जारी केली आहे. शिक्षण विभाग महाराष्ट्रातही हा आदर्श पॅर्टन राबवण्याच्या विचाराधीन दोन सत्रांमध्ये शाळा भरविण्याकरिता वेळापत्रकात बदल करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिक्षकांना देखील एका सत्रात काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि तेथे पटसंख्या कमी असेल तर तेथे दोन सत्रात शाळा भरविण्याची आवश्यकता नाही. मात्र, पहिली ते सातवी/आठवीपर्यंत वर्ग असणार्‍या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरवावी लागणार आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमतरता असल्यास तेथे देखील दोन सत्रात शाळा भरवावी, अशी मागणी केली आहे.

सामाजिक अंतर राखण्याकरिता पदवीपूर्व महाविद्यालयांच्या वर्गखोल्या, बंद पडलेल्या शाळांमधील खोल्या, समुदाय भवन, दुपारनंतर अंगणवाड्यांच्या खोल्यांचा वापरही करता येईल. खासगी विनाअनुदानित शाळांच्या व्यवस्थापन मंडळांनी सामाजिक अंतर राखण्याची आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी घ्यावी. विद्यार्थ्यांची ने-आण करताना सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना शिक्षण खात्याने दिली आहे.
…..
6 आठवड्यांत 36 तासिका
प्रत्येक आठवड्यात गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि प्रथम भाषा विषयांच्या प्रत्येकी 6 तासिका घ्याव्यात. द्वितीय व तृतीय भाषा विषयांच्या प्रत्येकी 5 तासिका, शारीरिक शिक्षण 4 तसेच चित्रकला/संगीत/कार्यानुभवच्या 3 तासिका, वाचन/संगणक शिक्षण 2 आणि पाठ्यपुरक उपक्रमांसाठी 2 याप्रमाणे एकूण 45 तासिका घेतल्या जातात. त्यापैकी शारीरिक शिक्षणाच्या 3 तासिका, चित्रकला/संगीत/कार्यानुभवच्या 3 तासिका, पाठ्यपुरक उपक्रमांमधील 2 आणि वाचन/संगणक विषयाची एक तासिका कपात करून आठवड्यातून 36 तासिका घेण्याचे प्रयोजन आहे.

सकाळच्या सत्रात :

First Published on: May 19, 2020 9:04 PM
Exit mobile version