Telgi Stamp Paper Scam : सर्व आरोपींची निर्दोष सुटका

Telgi Stamp Paper Scam : सर्व आरोपींची निर्दोष सुटका

फोटो सौजन्य - Topcount

तेलगी बनावट स्टॅप घोटाळा!! देशात सर्वात मोठा गाजलेला घोटाळा. कोट्यावधी रूपयांच्या या घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार अब्दुल करिम तेलगी याचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. बनवाट स्टॅप घोटाळा हा ३२ हजार कोटींचा होता. त्यामध्ये ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. २००३ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल दिला. यावेळी भक्कम पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष सुटका करत असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं. अब्दुल करीम तेलगी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. अब्दुल करीम तेलगी हा  बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. अब्दुल करिम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिक येथे बनावट स्टॅप व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान, या व्यवसायाला पाकिस्तान आणि बांगलादेश या ठिकाणावरून देखील छुपे पाठबळ मिळत होते. बनावट स्टॅप घोटाळा उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती.

First Published on: December 31, 2018 3:24 PM
Exit mobile version