सातपूर गोळीबारप्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच

सातपूर गोळीबारप्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनी जवळ रविवारी (दि.१९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबार पप्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जण फरार आहेत. हल्लेखोर फरार झाल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

रविवारी भरदुपारी स्कोडा (एमएच १५ डी एम ७६३९) गाडीतून आलेल्या संशयित आशिष जाधव, चेतन इंगळे अक्षय भरती, गणेश जाधव, किरण चव्हाण यांनी हुंडाई गाडी(एम एच ०४इ एक्स ५६७८)तील तपन जाधव व राहुल पवार यांच्यावर हल्ला केला. त्यापूर्वी त्यांनी स्कोडाने तपन जाधव असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात गाडी जागेवरुन थांबली. त्यानंतर टोळक्याने तपन जाधव याच्यावर कोयत्याने डोक्यावर वार केला. शिवाय, त्याच्यापाठीवर व पोटावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला केला.

रविवारी रात्री तपन जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. हुंडाई गाडीतील राहुल पवार याने भितीवरून उडी मारून छोट्या कंपनीत लपून बसला असल्याने आपसातील जुन्या नातेवाईक यांच्या खुनाचा बदला म्हणून या वादातून पाच संशयित आरोपी यांनी तपन जाधव यावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी अपघात वाहन घटनास्थळी सोडून एका कामगारांची दुचाकी घेत पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा महेंद्र चव्हाण यांनी सातपूर वरीष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तपन जाधव यास अर्धांगवायू झटका
गोळीबारात जखमी झालेल्या तपन जाधव यास मज्जातंतू गोळी लागली. गोळी पोटाकडील बाजूस अडकली होती. त्यास कमरेखाली अर्धांगवायू झटका आला असून, त्याची हालचाल होत नाही. शिवाय, त्याच्या डोक्यावर चार पाच टाके पडले आहेत. त्याला लागलेली गोळी काढली आहे. : डॉ. संदेश चव्हाण, अस्थीरोगतज्ज्ञ

First Published on: March 21, 2023 12:35 PM
Exit mobile version