१ ते १० जुलैदरम्यान बससेवा सुरु करण्याचा निर्णय

१ ते १० जुलैदरम्यान बससेवा सुरु करण्याचा निर्णय

महापालिकेच्या वतीने येत्या १ ते १० जुलै दरम्यान शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय नाशिक मनपा परिवहन सिटीलींक कंपनीच्या गुरुवारी (दि. २४) झालेल्या सहाव्या बैठकीत घेण्यात आला. या विषयीची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. शहरातील नऊ मार्गावर या बसेस धावणार असून त्यासाठी २४० बस थांबे असतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने नाशिक महापालिका परिवहन सिटीलींक कंपनीच्या संचालक मंडळाची सहावी बैठक झाली. यावेळी बसेसच्या मंजूर दराबाबत संचालक मंडळास सविस्तर माहिती देण्यात आली. शहर बसेस संदर्भातील कामाचा आढावा घेवून आत्ताच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. त्यात टर्मिनल बांधणे, आय.टी.एम.एस यंत्रणा, बस चालक व वाहक यांची सज्जता या आदी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने २४० बसथांब्याजवळ रिफ्रेशमेंट सेंटर उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत कंपनीच्या संचालकपदी सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच एसटीचे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीसाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कंपनीचे मुख्य लेखाधिकारी म्हणून पालिकेचे उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावित यांची तात्पुरती स्वरुपात नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीत लेखापरीक्षक यांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, सभागृहनेते कमलेश बोडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते अरुण पवार, शहर अभियंता संजय घुगे, स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखा परिक्षक बी.जे सोनकांबळे, अधीक्षक अभियंता एस एम चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी,बाजीराव माळी, एस.टी.चे अधिकारी मिलिंद बंड, वसंत गायधनी, राजेश वाघ,रणजित ढाकणे आदी उपस्थित होते.

बसचे मार्ग असे-

First Published on: June 25, 2021 3:30 PM
Exit mobile version