‘बॉश’ कंपनीतील साडे आठ लाखांच्या मालावर कामगारांचा डल्ला

‘बॉश’ कंपनीतील साडे आठ लाखांच्या मालावर कामगारांचा डल्ला

 देशभर उद्योग क्षेत्रात मोठे नाव असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीतील कामगार व बाहेरील संशयितांनी संगनमताने सुमारे 8 लाख 38 हजार 553 रुपयांचे स्पेअर पाटर्र्सची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बॉश कंपनीचे अधिकारी श्रीकांत ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बॉश कंपनीतील कामगार, सफाई कर्मचारी, चहा नास्ता देणारे कामगार, कॅन्टीनचे कामगार व कचरा बाहेर नेणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 ते 12 जून 2021 या कालावधीत कंपनीतील संशयित कामगारांनी चहा-नाष्टा पुरविण्यास येणार्‍या ट्रॉलीचालकाशी संगनमत करुन ट्रॉलीच्या खालच्या भागात थोडे-थोडे स्पेअरपार्ट हलवले. हे स्पेअर पार्ट ट्रॉली चालकाने संबधित लॉकरमध्ये ठेवला. त्यानंतर चोरीचे स्पेअर पाटर्र्सची घनकचरा वाहून नेण्यासाठी येणार्‍या अ‍ॅपेचालकाशी संगनमत करून करुन कचर्‍याखाली स्पेअर पाटर्र्स लपवून कंपनीबाहेर नेले. अशा पद्धतीने 4 लाख 57 हजार 132 रुपये किंमतीचे 236 सीकेडी वॉलसेट, एक लाख 10 हजार 171 रुपयांचे 29 नोझल, एक लाख 13 हजार 715 रुपयाचे 350 वॉल पिस्टन, एक लाख 57, 500 रुपये किंमतीचे वॉल पीस असे एकूण 8 लाख 38 हजार 553 रुपयांचे महागडे स्पेअर पाटर्र्सची चोरुन नेले. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करत आहे.

 चोरीचे राजकीय कनेक्शन

बॉश कंपनीत २०१८ मध्ये स्पेअर पाटर्र्सची कामगार आणि स्थानिक नागरिकांनी केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. हे प्रकरण उघडकीस येऊ नये, यासाठी राजकीय हस्तक्षेप करुन आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल झाले होते.

कंपनीतून पाटर्र्सची चोरी होत असल्याने कंपनी मालकसुद्धा नाशिकमध्ये आले होते. त्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता कंपनीच्या पाटर्र्सची काळ्या बाजार विक्री होत असल्याचेही समोर आले होते. चोरीप्रकरणात दोन पोलीस कर्मचारी व राजकीय पुढार्‍यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

दोघांना तीन दिवसांची कोठडी

बॉश कंपनीतील स्पेअर पाटर्र्स चोरीप्रकरणात सातपूर पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली. संजय अशोक रोकडे (३०, रा. लोकमान्य नगर, सिडको, नाशिक) , कमलेश सुरेश पिरमले (वय ३५, रा.अशोकनगर, सातपूर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

२०१८ मध्ये बॉश कंपनीला ११ कोटींना गंडा

जानेवारी २०१८ मध्ये बॉश कंपनीतील ११ कोटी ६६ लाख रुपयांच्या स्पेअर पाटर्र्स चोरीचे समोर आले होते. या प्रकरणात अंबड पोलिसांनी तपासत करत संशयितांना अटक केली होती. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. कंपनीतील भंगार मालाचा ठेका घेतलेल्या प्रमुख संशयित छोटू चौधरी याने कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअर पाटर्र्स चोरुन डिफेक्टिव्ह पाटर्र्सची रिपेअर करण्यासाठी सिडकोतील पंडित नगरमध्ये तीन मजली इमारतीत कारखानाच सुरु केला होता. बॉश कंपनीचे हे स्पेअर पाटर्र्स तो विविध राज्यांमध्ये विक्री करुन कंपनीची फसवणूक करत असल्याचे समोर आले होते.

First Published on: June 15, 2021 6:26 PM
Exit mobile version