‘नीट’ परीक्षा तुर्त स्थगित

‘नीट’ परीक्षा तुर्त स्थगित

नशिक : एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात येणारी नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा तुर्त स्थगित करण्यात आली आहे. येत्या 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार घेतली जाईल.
’एनटीए’तर्फे मे महिन्यात घेण्यात येणारी नीट 2020 परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेस देशभरातून साधारणत: 15 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी घाबरुन न जाता परीक्षेपर्यंत अभ्यास सुरुच ठेवण्याचे आदेश एनटीएतर्फे देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख ’एनटीएनीट.एनआयसी.इन’या संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे. तसेच काही अडचण असल्यास 8287471852 किंवा 8178359845 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: March 28, 2020 6:01 PM
Exit mobile version