पोलिसांनी मुद्देमालासह पकडला काही तासांत चोर

पोलिसांनी मुद्देमालासह पकडला काही तासांत चोर

नाशिकरोड येथील देवळाली गावातील म्हसोबा मंदीरा शेजारील दुकानात काम करणा-या कामगारांनीच चोरी केलेले एक लाख पंधरा हजार रुपये पोलीसांनी काही तासांत हस्तगत केले. उपनगर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली गावातील म्हसोबा मंदीराच्या मागे असलेल्या हेमंत कांकरीया यांचे किराणा दुकान आहे, कांकरीया यांनी शुक्रवारी(6) दुपारी एका व्यापा-याला देण्यासाठी आणलेली रक्कम काऊंटर मध्ये ठेवली होती, संध्याकाळी सदर व्यापारी आल्यानंतर काऊंटर पाहिले तर त्यातील एक लाख पंधरा हजार रुपये सातशेचाळीस रुपये चोरी गेल्याचे समजले, कांकरीया यांनी रात्री उशिरा उपनगर पोलीसांत तक्रार दाखल केली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ गोडसे, किरण देशमुख, राहुल खांडबहाले यांनी पंचनामा करत दुकानातच काम करणारे गोरख कचरु म्हस्के रा. हांडोरे मळा, विहीतगाव व रुबेर इक्बाल मंसुरी रा. देवळाली गाव यांना ताब्यात घेतले, गुन्ह्याची कबुली मिळत नसल्याने कसुन चौकशी केली असता रुबेर मंसुरी याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गोरखच्या घरातुन एक लाख पंधरा हजार सातशेचाळीस रुपये हस्तगत केले, पोलीसांनी काही तासात चोरी उघड करुन रक्कम परत मिळवुन दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.


हे ही वाचा : चोर कप्प्यात दडवलेला १० लाखांचा मद्यसाठा जप्त 


 

First Published on: September 7, 2019 8:23 PM
Exit mobile version