प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला पुन्हा मिळाला मोबाईल

प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला पुन्हा मिळाला मोबाईल

प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला तिचा मोबाईल पुन्हा सुखरुपणे परत मिळाला. मखमलाबाद येथील प्रदीप जेबू पराते या चालकाने आपल्या रिक्षात विसलेला मोबाईल अंबड पोलीस ठाण्यात येत महिलेला दिला. या प्रामाणिक रिक्षाचालकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अनिता भाऊसाहेब घनसावत (रा. रामकृष्ण नगर, एक्सलो पॉईंट) सोमवारी (दि.२) प्रदीप जेबू पराते (रा. मखमलाबाद) यांच्या रिक्षा (एम एच 15-एफ व्ही ५९७८)ने लेखानगर येथे आल्या. रिक्षातून उतरल्यावर त्यांनी रिक्षाचालकास प्रवास भाडे देवून त्या निघून गेल्या. काही कालावधीनंतर मोबाईल रिक्षातच राहिल्याचे अनिता यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाणे येथे संपर्क साधला. त्यानुसार कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक पवन परदेशी यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. पराते यांना रिक्षात मोबाईलची रिंग ऐकू येताच महिला मोबाईल रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कॉल उचलून अंबड पोलीस ठाण्यात मोबाईल घेवून येत असल्याचे सांगितले. त्यानंतर ते मोबाईल घेवून पोलीस ठाण्यात आले. पराते यांनी अनिता घनसावत यांना मोबाईल पोलिसांसमक्ष स्वाधीन केला. यावेळी पोलीस शिपाई रवींद्र कोळी, पोलीस नाईक योगेश रेवगडे उपस्थित होते.

First Published on: November 3, 2020 7:18 PM
Exit mobile version