अजितदादांना सुनावणारा ‘तो’ युवक नाशिकचा

अजितदादांना सुनावणारा ‘तो’ युवक नाशिकचा

नाशिक : मंत्रालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि.9) सकाळी ‘सारथी’ संस्थेसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत छत्रपती संभाजी राजेंना तीसर्‍या रांगेत बसण्यास मज्जाव करणारा तरुण हा नाशिकचा आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी या बैठकीत गोंधळ घातला.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. एक वर्षापूर्वी मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे म्हणून गायकर यांनी नाशिकमध्ये प्रथमत: आवाज उठवला. आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करत गायकर यांनी चव्हाण यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली आहे. तसेच ‘सारथी’ या संस्था सुरु ठेवण्यासाठीही आग्रही भूमिका मांडली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकित छत्रपती संभाजी राजे यांना समोर खाली खुर्च्यांवर बसलेल्या सदस्यांमध्ये तिसर्‍या रांगेत बसवण्यात आलं. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा समाज समन्वयकांमध्ये नाराजी पसरली. त्यावर तीव्र आक्षेप घेत समन्वयकांनी संभाजी राजे यांना व्यासपीठावर बसावं असा आग्रह समन्वयकांकडून करण्यात येत होता. पण शेवटी संभाजी राजेंनी त्यांची समजूत काढून तिसर्‍या रांगेतच बसणं पसंत केलं.

First Published on: July 9, 2020 1:24 PM
Exit mobile version